बसवन कुडची येथील विठ्ठल रखुमाई गल्लीतील गेल्या तीन वर्षापासून तुंबून असलेल्या ड्रेनेजच्या चेंबर दुरुस्तीसह सांडपाण्याचा निचरा केल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून ते नगरसेवक बसवराज मोदगेकर यांना धन्यवाद देत आहेत.
बसवणं कुडची येथील विठ्ठल रखुमाई गल्लीतील ड्रेनेज गेल्या 3 वर्षापासून ब्लॉक झाले होते. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
सदर बाब विठ्ठल रखुमाई गल्लीतील रहिवाशांनी नगरसेवक बसवराज मोदगेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. तेंव्हा नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी त्वरित महानगरपालिकेला कळवून त्या ड्रेनेज चेंबरची जातीने उपस्थित राहून दुरुस्ती करून घेतली.
त्यामुळे नागरिकात समाधान होत आहे. याप्रसंगी नगरसेवक बसवराज मोदगेकर, राजू मुतगेकर, भैरु दिवटे, कल्लप्पा बेडका, किरण पाटील, भीम सूनगार व गल्लीतील नागरिक उपस्थित होते.





