बेळगाव : हॉटेल, रेस्टोरंट आणि मनोरंजन पार्कसाठी असणाऱ्या मालमत्ता करात कर्नाटक सरकारने ज्याप्रमाणे करसवलत दिली आहे.
त्याप्रमाणे इतर व्यापारी, कारखानदार, शिक्षण संस्था यांनाही ५० टक्के पर्यंत करसवलत देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी केली.
बेळगाव महानगरपालिका आवारात माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशिपुडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण करत शासनाकडे सदर मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले.
यासंदर्भात माजी नगरसेवकांनी माहिती देताना सांगितले कि, आतापर्यंत महानगरपालिका प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक राज्यांमध्ये १० टक्क्यांची सवलत मालमत्ता करात देण्यात आली आहे.
मात्र बेळगावमध्ये हि सवलत केवळ ५ टक्क्यांइतकीच देण्यात आली आहे. इतर राज्यांप्रमाणे मालमत्ता करात १० टक्के आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्यासाठी १०० टक्के तर शाळा, महाविद्यालय आणि हॉस्टेल साठी ५० टक्क्यांपर्यंत करसवलत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.