युक्रेन मध्ये प्रत्येक मिनिटाला गोळीबार आणि बॉम्ब असा आवाज यायचा… युक्रेन मधल्या भारतीय दूतावासात आम्ही आश्रयाला होतो आमच्या सोबत शिकणारे सगळे विद्यार्थी भारतात सुखरूप परतले आहेत अश्या भावना युक्रेन हुन रविवारी बेळगावला परतलेल्या ब्राह्मी पाटील या विद्यार्थीनीचे आहेत.
24 फेब्रुवारीला आमचे मायदेशी परतण्याचे विमान होते पण भरपूर बॉबिंग झाल्यामुळे आमचे विमान रद्द झाले आणि आमच्यावर दडपण आले वातावरण भीतीदायक होते मात्र आम्ही त्याची जिद्द सोडली नाही.
आम्ही रेल्वेने सीमेपर्यंत आलो त्यानंतर रोमानिया सरकारने आम्हाला खूप चांगले सहकार्य केले शेवटी आम्ही मायदेशात येऊन पोहचलो अश्या भावना होत्या चिक्कोडी मधल्या ब्राह्मणी पाटील या एमबीबीएस च्या पहिल्या सेमिस्टरचा मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या…बेळगाव विमानतळावर या विद्यार्थिनीचे रविवारी आगमन झाले त्यावेळी त्या विद्यार्थिनीने माध्यमांशी संवाद साधत आपल्या मनातली भीती व्यक्त केली
बेळगाव विमानतळावर ब्राह्मणी मनोज पाटील या विद्यार्थिनीचे आगमन झाले त्यावेळी बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी त्या विद्यार्थिनीचे विमानतळावर स्वागत केले ब्राह्मणी ही बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे राहणारी आहे आणि एमबीबीएसच्या प्रथम वर्षात ती शिकत होती वैद्यकीय शिक्षणासाठी ती युक्रेन ला गेली होती.
जिल्हाधिकारी आणि उमेश कती यांच्यासह बेळगावच्या विमानतळावर बाहेर ब्राह्मणी चे आई वडील आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती आपली मुलगी कधी एकदा परत घरी येईल याची नातेवाईक वाट बघत होते विमानतळाच्या बाहेर येताच ब्राह्मी ने आपल्या आई-वडिलांना घट्ट मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी या मुलीच्या नातेवाईकांना देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत एकूणच युक्रेन मध्ये अडकलेले हजारो विद्यार्थी हळूहळू सुखरूप मायदेशी दिसत आहेत.