Sunday, November 17, 2024

/

इंटरनेटच्या युगातील ऑनलाईन भोंदू बाबा!

 belgaum

सध्या जमाना ऑनलाईनचा आहे. या ऑनलाइनच्या जमान्यात अडचणीत सापडलेले अनेक लोक कोणत्याही अमिषाला भाळून कर्मकांडाच्या आहारी जातात. आपला देश साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणारा असून विज्ञानाच्या युगात देखील अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाणारे लोक आणि त्यांचे विचित्र कारनामे पाहून कुणीही थक्क नाही झालं तरच नवल!

ऑनलाईन फसवणुकीची आपण अनेक प्रकरणे ऐकत आणि पाहात आलो आहोत. परंतु आता चक्क ऑनलाईन पद्धतीने मूल होणे हेदेखील ऑनलाईन फसवणुकीचे एक उदाहरण झाले आहे. एका भोंदूबाबाने ऑनलाईन अभिषेक केल्यानंतर मूल होईल असे सांगत लाखोंचा गंडा घातला आहे. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या भोंदूबाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भट नावावर पॅम्प्लेट छापून आपले सर्व दोष निवडण्यात येतील, असे सांगत अनेक अंधश्रद्धाळू भाविकांचा विश्वास या भोंदूबाबाने मिळवला. या पॅम्प्लेट वरील मजकुरावर आणि भोंदूबाबाच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून अनेक भाविकांनी आपल्या समस्या या बाबाकडे मांडल्या आहेत. राम भट या नावे भविष्याचा व्यवसाय करणाऱ्या या इसमाचे नाव आहे बसवराज दुर्गप्पा बुडबुडकेर. ३७ वर्षाच्या या इसमाने केलेल्या या कृत्याचा बेळगाव सायबर पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला आहे.Cen police station

हे पॅम्प्लेट वृत्तपत्रांमध्ये घालून वितरित करण्यात आले होते. या माध्यमातून एका महिलेने या भोंदू बाबाशी संपर्क साधला. आपल्याला अपत्य होत नसल्याची समस्या या बाबाला सांगून दोष निवारण्याची विनंती केली. यावेळी या बाबाने आपली फी ऑनलाईन भरण्यास सांगितली. फी भरल्यानंतर आपण अभिषेक आणि इतर विधी करून ऑनलाईन या समस्येवर उपाय सांगण्याचे महिलेला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे या महिलेला लक्षात आले. यानंतर बसवराज बुडबुडकेर याच्यावर बेळगावच्या सीईएन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. सीईएन इन्स्पेक्टर गड्डेकर यांनी या प्रकरणी तपास घेऊन सदर इसमाचे खाते सील केले.

आपण २१ व्या शतकात जगणारी माणसे असून देखील अशा भूलथापांना बळी पडतो हे आजच्या विज्ञान युगाचे दुर्दैव म्हणावे लागेल. विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. नवनवे शोध लावले आहेत. परंतु तरीही कित्येक नागरिक अशा अनेक भूलथापांना बळी पडून आपले नुकसान करून घेत आहेत. या साऱ्या प्रकारातून प्रत्येकाने शहाणपण शिकून अशा गोष्टींपासून सावध राहणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.