मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या एका बीएसएफच्या कॉन्स्टेबलने आपल्या सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार केल्याने झालेल्या घटनेत पाच जवानांचा मृत्यू झालाय तर दहा जण जखमी झाले आहेत.
भारत पाकिस्तान सीमेवर पंजाब येथील अमृतसर जवळ बी एस एफ कॅम्प मध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील वंटमूरी गावचा हा बीएसएफ जवान आहे त्याचे नाव सत्याप्पा सिद्धप्पा किलार्गी वय 33 असे असून तो 13 वर्षांपूर्वी बी एस एफ मध्ये भरती झाला होता सध्या भारत पाकिस्तान सीमेवर पंजाब मध्ये सेवा बजावत होता.
रविवारी सायंकाळी सत्याप्पा याने केलेल्या गोळीबारात पाच जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य दहा जवान जण जखमी झाले आहेत या घटनेत सत्याप्पाच्यादेखील डोक्याला गोविंद लागले असून त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
पोलीस सूत्रांनी सांगितले माहितीनुसार सदर घटना पंजाब अमृतसर जवळील पाकिस्तान बॉर्डर जवळील बी एस एफ कॅम्प मध्ये घडली असून स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
तो कॉन्स्टेबल तेरा वर्षांपूर्वी तो सीमा सुरक्षा दलात भरती झाला होता कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांमुळे तो गेल्या काही दिवसापासून मानसिक अस्वस्थ होता त्याला आणखी काही दिवस सुट्टी हवी होती आपल्या मूळ गावी रहायचं होतं मात्र त्याच्या कंपनीने त्याला सुट्टी दिली नव्हती आणि बी एस एफ कंपनीने लवकरात लवकर ड्युटी जॉईन करण्याचे आदेश दिले होते त्याच्यामुळे रागाच्या भरात येऊन त्यानं गोळीबार केला असल्याचे बोलले जात आहे .
मूळ गावी त्याच्यावर मानसिक तज्ञाकडे देखील उपचार सुरू होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सत्याप्पाने कमांडंट गाडीवर देखील गोळीबार गेला होता कमांडंट सतीश मिश्रा या घटनेत जखमी झाले आहेत.