हिंदू देवस्थान परिसरात मुस्लिमांच्या व्यापारास विरोध हा भाजपचा हिडन अजेंडा आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी आज केली.
शहरातील काँग्रेस भवनमध्ये आज गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यात भाजपने शिमोगा घटना आणि हिजाब घटना यांचे भांडवल केले, आता मुस्लिम व्यापारावर बहिष्कार हा त्यांचा नवा अजेंडा आहे.
जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम मैत्रीच्या सौहार्दपूर्ण वातावरणात राहत असताना बहिष्काराचा हा प्रकार करणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. असे जारकीहोळी म्हणाले.
शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अपेक्षा खूप आहेत. परंतु हाय कमांडचा निर्णय अंतिम राहील, असे आमदार रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, काँग्रेस नेते सुनील हणमन्नावर आदी उपस्थित होते.