बेळगुंदी खून प्रकरणाचा पाच दिवसात छडा लावून आरोपींना गजाआड करण्याचे काम बेळगावच्या ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
26 फेब्रुवारी रोजी गजानन बाळाराम नाईक वय 51 याचा रात्रीच्या वेळी राहत्या घरात गळा चिरून अज्ञातानी खून केल्याची घटना घडली होती. गजानन यांचे भाऊ सुरेश यांनी याबाबत 27 रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार बेळगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांनी मृतक गजानन नाईक यांच्या आरोपींचा केवळ पाच दिवसाच्या आत्ताच छडा लावून त्यांना गजाआड केले आहे.
याप्रकरणी समजलेल्या अधिक माहितीनुसार मयत गजानन नाईकेचे बेळगुंदी येथील विद्या पाटील या महिलेशी अनैतिक संबंध होते याचा संबधाचा फायदा घेत मृतक गजानन हा त्या महिलेकडे अनेकदा पैशाची मागणी करत होता.
अनेकदा पैशाची मागणी केल्यानंतर अखेर कंटाळून विद्या पाटील हिने तिचा मुलगा ऋतिक पाटील आणि त्याचा मित्र परशुराम गोंधळी याच्या मदतीने गजानन याचा गळा चिरून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.या प्रकरणी आई मुलांसह मुलाच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.
सदर खून प्रकरणाचा तपास बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केवळ पाच दिवसात केल्याने पोलीस आयुक्त डॉक्टर आणि रवींद्र येणे ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे