Monday, January 6, 2025

/

*3 रे बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस यांची निवड*

 belgaum

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या
3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांना निवडीचे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिले. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील व बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी दिली आहे.

या अगोदर ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे,श्रीराम पचिंद्रे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे .
उद्घाटन सोहळा,परिसंवाद,कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.

3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे चिकित्सक लेखक,अभ्यासक,संशोधक म्हणून ख्यातकिर्ती आहेत.Sabnis

ज्ञानेश्वर ते आंबेडकर, संत नामदेव-तुकारामांचे सांस्कृतिक संचित, आदिवासी प्रतिभावंताचे साहित्य, छत्रपती शिवाजीराजे आणि ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद विवेकवादी भूमिका, उपेक्षितांची पहाट,संचिताची चांदणवेल,मुक्तक,सेक्युलरिझम व संत साहित्य,इहवादी संस्कृती शोध,गंधवेडी समीक्षा,इतिहास आकलनाचे प्रयोग, संतत्व व देवत्वाचा शोध,नवी पालवी नवा रंग, वारकरी संगीत आणि संचित,बहूसांस्कृतिक व्यक्तीत्वाचे रंग- तरंग, इतिहास, संशोधनात्मक ग्रंथ,ललित लेखन, 1 वगनाट्य, चरित्रलेखन,समीक्षान्मक ग्रंथाचा समावेश आहे, एकूण 83 ग्रंथाचे विपुल लेखन त्यांनी केले आहे, पिंपरी येथे संपन्न झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषिवले आहे.

संमेलन यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा अभामसाप कार्याध्यक्ष महादेव चौगुले , उपाध्यक्ष डी बी पाटील , सचिव रणजीत चौगुले , सहसचिव संजय गुरव , शिवसंत संजय मोरे , एम . वाय. घाडी , सुरज कणबरकर , एम के पाटील , मोहन अष्टेकर , संदिप तरळे , महिला उपजिल्हाध्यक्ष अरुणा गोजे – पाटील , स्मिता चिंचणीकर यासह कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.