हिजाब संदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 14 मार्चपासून जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज मागे घेतला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भादवि कलम 144 अन्वये बेळगाव शहरासह जिल्ह्यात जमाव बंदीचा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला होता.
तथापि न्यायालयाच्या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार न घडल्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश आज गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून मागे घेतला आहे.
प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आल्यामुळे होळी सण साजरा करण्यामध्ये निर्माण झालेला मोठा अडथळा दूर झाला आहे.