बेळगाव परिसरातील मराठा समाजाच्या प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठा समाजाचे आराध्य दैवत श्री जत्ती मठ देवस्थानात आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव सह सीमा भागातील क्षत्रिय मराठा समाजाचे आराध्य दैवत श्री श्री मंजुनाथ स्वामीजी यांची आणि दावनगेरे होदेगेरे येथील शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देण्या विषयी या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे.
बेळगाव शहर परिसरातील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी विकासाकरिता या बैठकीत चर्चा केली जाणार असून मराठा समाज बांधवांनी या बैठकीला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.