बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आज बुधवारी प्रति क्विंटल लाल कांद्याचा दर 1300 रुपये तर जवारी बटाट्याचा दर 1800 रुपये इतका झाला होता.
बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गेल्या शनिवारी महाराष्ट्रातून 32 ट्रक लाल कांदा, 1 ट्रक पांढरा कांदा, त्याचप्रमाणे इंदूर बटाटा 5 ट्रक आणि जवारी बटाटा सुमारे 3 हजार पिशव्या आवक झाली होती.
सध्या बेळगाव एपीएमसी बाजारात इंदूर बटाटा कमी प्रमाणात येत असून तालुक्यातील जवारी बटाट्याचे प्रमाण जास्त आहे. एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आज गुरुवार बुधवारी कांदा आणि बटाट्याचा प्रति क्विंटल दर पुढीलप्रमाणे होता.
लाल कांदा -500 ते 1300 रुपये, पांढरा कांदा -500 ते 1200 रु. जवारी बटाटा -800 ते 1800 रु. आणि इंदोर बटाटा -1000 ते 2000 रुपये.