बेळगाव ते खानापूर या 30 कि. मी. अंतराच्या सहापदरी रस्त्याच्या प्रकल्पापैकी 16.3 कि. मी. अंतराचा प्रकल्प पूर्ण केल्याचे तात्पुरते प्रमाणपत्र अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला मिळाले आहे.
कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4ए वरील बेळगाव ते खानापूर हा कि.मी. 00.000 ते कि.मी. 30.800 अंतराचा रस्ता एनएचडीपी फेज 4 अंतर्गत हायब्रीड ॲन्युटी मोड प्रकल्पानुसार सहापदरी बनविण्याचे कंत्राट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशोका बिल्डकॉन लिमिटेडला दिले आहे. सदर कंपनीने राष्ट्रीय महामार्गाच्या या 30.800 कि. मी. अंतराच्या प्रकल्पापैकी 16.345 कि. मी. अंतराच्या मार्गाचे सहापदरीकरण करण्याचे काम पूर्ण केल्याचे तात्पुरते प्रमाणपत्र आपल्याला मिळाले असल्याचे जाहीर केले आहे. बेळगाव ते खानापूर सहापदरी महामार्गाचा प्रकल्प अशोका कन्सेशन लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अशोका बेळगाव खानापूर रोड प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रत्यक्ष कृतीत उतरविला जात आहे.