Thursday, November 28, 2024

/

नदीपात्रात पडून युवकाचा मृत्यू

 belgaum

मार्कंडेय नदीत पडल्यामुळे एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावानजीक उघडकीस आली.

नदी पात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव प्रसाद मादार (वय 25) असे आहे. मूळचा माडीगुंजी (ता. खानापूर) येथील रहिवासी असलेला प्रसाद आपल्या नातलगांकडे राहत होता.

मनोरुग्ण असणारा प्रसाद हा गेल्या शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाला होता. काल त्याच्या नातलगांनी पोलिसात तक्रार नोंदविली होती.

त्यानंतर आज मार्कंडेय नदीच्या काठावर त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मनोरुग्ण प्रसाद मादार तोल जाऊन नदीत पडल्याने मयत झाल्याचा कयास आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.