बेळगाव सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं असा ठराव बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक पत्रकार विजयकुमार दळवी होते.
17व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध ठराव मांडण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात आला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मिटवा यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्याकडे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी मागणी करणारा ठराव या ठिकाणी मांडण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातील मराठी भाषिक आपल्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहेत भाषिक अल्पसंख्याक आयोग आणि राज्य घटनेला अनुसरून आमची मागणी रास्त आहे ,म्हणूनच कर्नाटक सरकारने ही मागणी मान्य करून मराठी भाषिकांना मराठीतूनच परिपत्रके देण्यात यावीत अशी मागणी आज या ठिकाणी करण्यात आली.
ल मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा देण्यात यावा,यासंबधीचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठविण्यात आला आहे याचा विचार करून सरकारने त्वरित मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून द्यावा तसेच सध्या सुरू असलेल्या
युक्रेन व रशिया मधील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटले आहेत.संपूर्ण जगावर भीतीचे सावट पसरले आहे.पुन्हा एकदा महायुद्धाचा भडका उडतोय की काय आशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी त्वरित हे युद्ध थांबविण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी ठरावा द्वारे करण्यात आली आहे.
संमेलनात सीमा प्रश्नांत कार्य केलेल्या अनेक मयताना श्रद्धांजली वाहण्यात आली.