युक्रेन मध्ये शिकत असलेली बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील जगन्नाथ पाटील यांची कन्या ऐश्वर्या पाटील ही देखील सुखरूप मायदेशात परतली असून सोमवारी आपल्या मूळ गावी येळ्ळूरला येणार आहे त्यामुळे तिच्या पालकांची देखील चिंता दूर झाली आहे.
रशिया विरुद्ध युक्रेन युद्धात अनेक जण अडकले असून बेळगाव जिल्ह्यातील 12 विद्यार्थी अडकले होते त्यापैकी काल संती बस्तवाड येथील एम बी बी एस शिकणारी फिरोजा सुबेदार बेळगावला परतली होती आता उद्या सोमवारी युक्रेन मध्ये एम बी ए दुसऱ्या सेमिस्टर मध्ये शिकत असलेली ऐश्वर्या ही दिल्लीत पोचली असून सोमवारी बेळगावला पोहोचणार आहे.
ऐश्वर्या ही येळ्ळूर गावची असून तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येळ्ळूर मध्ये झाले त्या नंतर बारावी पर्यंतचे शिक्षण रबिंद्रनाथ टागोर कॉलेज मध्ये झाले त्या नंतर एम बी ए साठी बुकोव्हियन स्टेट मेडिकल विध्यापिठात अडमिशन मिळवले 2021 मध्ये ती शिक्षणासाठी युक्रेन ला गेली होती.
दुसऱ्या सेमिस्टर मध्ये ती शिकत होती पहिल्या सेमिस्टरची परीक्षा देखील तिने दिली होती आता दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी ती लागली असून इथून पुढचे शिक्षण ती ऑनलाइन घेणार आहे असे तिच्या वडिलांनी संगीतले.