Sunday, January 5, 2025

/

जिल्ह्यातील मतभेद राज्याध्यक्ष मिटवतील : विजयेंद्र

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील सवदी, कत्ती विरुद्ध जारकीहोळी बंधू यांच्यातील वैमनस्य मिटविण्यासाठी भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील योग्य मार्ग काढतील, असा विश्वास राज्य भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केला आहे.

बेळगाव शहरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. भाजपा हा देशातील मोठा राजकीय पक्ष आहे. कर्नाटकातील भाजपची स्थिती मजबूत आहे.

पक्षातील सर्वजण संघटित असले तरी लहान-सहान मतभेद हे असणारच. तथापि हे मतभेद मिटवण्यासाठी राज्याध्यक्ष नलीनकुमार कटिल हे समर्थ आहेत, असे विजयेंद्र यांनी सांगितले.

बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून भाजपमध्ये काही आलबेल नाही आमदार आणि मंत्री यामध्ये समन्वय देखील नव्हता त्यामुळे विधानपरिषदची कवटगीमठ यांची जागा देखील  गमवावी लागली होती तर लोकसभा पोटनिवडणूकीची जागा केवळ कमी अंतरावर  समाधान मानव लागलं होतं त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात भाजपा मधले नेत्यांमध्ये दूरी निर्माण झाली होती थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली होती आता हा जिल्ह्यातील भाजपमधील नेत्यांचा दुरावा लवकरच कमी होईल असा विश्वास या विजेंद्र यांनी व्यक्त केलाय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.