बँकेच्या पिग्मी कलेक्टरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कामत गल्ली येथे आज सकाळी अकराच्या च्या सुमारास उघडकीस आली.
महादेव दरवंदर (वय सुमारे 40) असे आत्महत्या करणाऱ्या पिग्मी कलेक्टरचे नांव आहे. कर्जबाजारी झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. शहरातील एका बँकेत महादेव यांचे वडील पिग्मी कलेक्टर होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महादेव दरवंदर पिग्मी कलेक्टर म्हणून अतिशय उत्तम काम करत होता असे असले तरी आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट आहे.
मयत महादेव यांच्या पश्चात पत्नी आणि एक कन्या असा परिवार आहे. राहत्या घरी आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ज्यांच्याकडून कर्जाऊ पैसे घेतले त्या आठ जणांची नावे असल्याचे समजते. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.