मराठा समाजाच्या खानापूर तालुक्याच्या महिला विभागाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सोनाली सरनोबत यांची नियुक्ती करण्यात आली
शनिवारी शासकीय शिवजयंतीनिमित्त खानापूर मध्ये क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डॉ सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला आणि खानापूर तालुक्याच्या क्षत्रिय मराठा परिषदेच्या महिला अध्यक्षा अध्यक्षपदाची सूत्रे बहाल करण्यात आली
मराठा समाजाची ओळख योद्धा म्हणून आहे आणि आपल्या मातृभूमीची सेवा करण्यासाठी नेहमी मराठा समाज हा सज्ज राहिलेला आहे. मराठा लाईट इन्फंट्री सेंटर बेळगाव मराठ्यांच्या पराक्रमाचे सहसाचे जिवंत उदाहरण आहे.मराठा समाजाचा सर्वांगीण विकास आणि खानापूर तालुक्याचा विकास ही माझी उद्दिष्ट असेल असे देखील सोनाली सरनोबत यांनी बोलताना नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपदादा पवार होते .वकील एच एन देसाई क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई नगरसेवक नारायण मयेकर यांच्यासह सर्व प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली.
खानापूर नगरपंचायत च्या स्थायी समिती अध्यक्ष पदी प्रकाश बैलूरकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला अप्पय्या गुरव हरिबोल अमोल बेळगावकर संदीप शेमले कडेमनी सर यांच्यासह सर्व शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.