बेळगाव : बेळगावमध्ये सुरु असलेले स्मार्ट सिटी कामकाज अद्यापही रखडलेल्या परिस्थितीत आहेत. यासंदर्भात शनिवारी खासदार मंगला अंगडी यांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसमवेत प्रगती आढावा बैठक घेतली.
बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत होत असलेली कामे ही योग्य रीतीने होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शिवाय या कामकाजामुळे जनजीवनावर परिणाम देखील होत आहे. सदर स्मार्ट सिटी कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना प्रगती आढावा बैठकीत खासदार मंगला अंगडी यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी तातडीने हे कामकाज पूर्ण करण्यात यावे अशी सूचना खासदार मंगला अंगडी यांनी अधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीला आमदार अनिल बेनके, स्मार्ट सिटी एम.डी. प्रवीण बागेवाडी आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते