Monday, January 13, 2025

/

*सख्ख्या बहिणीच्या खून प्रकरणातून भावाला जामीन मंजूर*

 belgaum

बेळगाव : सहावे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती संध्या राव यांनी बहिणीच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी गजानन बसवंत पाटील (रा. खणगाव, बेळगाव) याला जामीन मंजूर केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती आधी कि, १२ ऑगष्ट २०२१ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास रविना बसवंत पाटील नामक तरुणी बसथांब्याजवळून जात असताना तिच्या सख्या भावाने तिला शेतात नेऊन तिचा गळा आवळून खून केला. शिवाय खुनानंतर रविनाचा मृतदेह जाळून रक्षा मलप्रभा नदीत विसर्जित देखील केली. सदर घटना खणगाव मधील रमेश हिंदीनकेरी यांनी प्रत्यक्ष पहिली होती. हि बाब गजानन पाटील याला समजताच रमेश याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

रविना बेपत्ता असल्याची फिर्याद रविणाच्या आईने मारिहाळ पोलीस स्थानकात नोंदविली होती. यानंतर नोव्हेंबर २०२१ रोजी रमेश हिंदीनकेरी यांनी संशयित आरोपी गजानन पाटील यानेच रवीनला शेतवाडीत नेऊन जीवे मारल्याचे सांगितले. यानंतर रविणाच्या वडिलांनी आपल्या मुलीचा खून झाल्याची फिर्याद पुन्हा मारिहाळ पोलीस स्थानकात नोंदविली. याप्रकरणी मारिहाळ पोलिसांनी ९ नोव्हेंबर २०२१ रोजी गजानन पाटील याच्यावर भादंवि कलम ३०२,२०१,५०६ नुसार गुन्हा नोंद केला होता.

या प्रकरणातील आरोपी गजानन पाटील याने सहाव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. सदर न्यायालयाने आरोपीचा अर्ज रुपये एक लाख रुपयांच्या हमीपत्रावर तसेच तितक्याच रकमेच्या जामीनदाराच्या अर्जावर मंजूर केला असून पुढील चौकशी आणि तपासासाठी पोलिसांना सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीच्यावतीने ऍड. प्रताप यादव आणि हेमराज बेंचन्नावार हे काम पहात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.