मिलिटरी महादेव मंदिरानजीक असलेल्या शिवतीर्थ याठिकाणी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि जीवन संघर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिटरी महादेव मंदिरानजीक शिवतीर्थावर आज शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी मराठा लाईट इन्फंट्रीचे कॅप्टन गिरीश आणि जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. गणपत पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थावरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. कार्यक्रमाचे पौरोहित्य मराठा लाईट इन्फंट्रीच्या पुरोहितांनी केले.
कार्यक्रमास माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आदींसह जीवन संघर्ष फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.