कुडची एपीएमसी सचिवांनी १० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी त्यांना न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. चौथ्या अतिरिक्त जिल्हा सत्र आणि विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एन व्ही विजय यांनी याप्रकरणी सुनावणी केली असून सुराप्पा हंकाप्पा लमाणी यांना सदर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कलम ७ सीसी कायदा १९८८ अन्वये ३ वर्षांचा कठोर कारावास तसेच रुपये ५००० रोख रक्कम असा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड भरणे टाळल्यास २ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच १३ (१) (डी), सहकलम १३ (२) पीसी कायदा १९८८ अन्वये ४ वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याचप्रमाणे १०००० रुपये रोख दंड देखील भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली असून दंड भरण्यात टाळल्यास ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
२४ डिसेम्बर रोजी फिर्यादी महादेव सुरेश चौगुले, रा. जलालपूर ता. रायबाग यांनी कुडची एपीएमसी सचिव
सुराप्पा हंकाप्पा लमाणी यांच्यावर परवाना देण्यासाठी रुपये १०००० लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकार एसीबी अधिकाऱ्यांनी ट्रॅप करून एपीएमसी सचिवांना रंगेहाथ पकडले होते.