मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आदेशानुसार राज्यातील कॉलेजीस बुधवारी सकाळी पूर्ववत सुरू झाली आहेत.हिजाब वादा मुळे मागील एका आठवड्या पासून राज्यातील सर्व महा विद्यालये बंद होती.
हिजाब परिधान करण्यावरून सुरू झालेल्या वादा नंतर राज्यातील शांतता भंग होऊ नये म्हणून शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली होती या अगोदर दहावी आणि हायस्कूल सुरू करण्यात आले होते मात्र कॉलेजचे वर्ग बंद होते आता ते बुधवार पासून सुरू झालेले आहेत.
बेळगाव शहरातील सर्व कॉलेज बुधवारी सुरू झाली आहेत या कॉलेज समोर मात्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस गाड्या आणि बॅरिकेडस देखील काही कॉलेज कडे तैनात आहेत.
या अगोदर जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ आणि पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांनी शहरातील कॉलेजना भेट देत हिजाब संबंधी सूचना केल्या होत्या. दोन्ही समाजातील प्रमुख नेत्यांच्या संघटनांच्या शांतता बैठका घेतल्या होत्या.
बुधवारी सकाळी शहरातील प्रत्त्येक कॉलेज समोर पोलीस तैनात असलेले चित्र होते एकूणच हिजाब संबंधी बेळगावात कोणताही वाद उफळू याची खबरदारी पोलीस खात्याने घेतली आहे.दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब संबंधी बुधवारी दुपारी सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.