शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते खासदार संजय राऊत आणि श्री राम सेना हिंदुस्थानचे आक्रमक रमाकांत कोंडुस्कर यांची गोव्यात भेट घडून आली.
नुकताच बेळगावात झालेला शिव संघर्ष आणि गोव्यातील तापलेल राजकारण या पाश्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण ठरत आहेत.एकंदर भाजपला देशातील अनेक राज्यांत बॅकफूटवर यावे लागत असताना पुढील वर्षी कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात काही महत्वपूर्ण चर्चा होतील असा जाणकारांचा कयास आहे.
रमाकांत कोंडुस्कर सारखा हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा रणांगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या पाश्र्वभूमीवर बेरजेचे गणित करण्याची शक्यता वाटतं आहे.शिवराय अवमान आंदोलन जेल भोगून जामिनावर मुक्त झालेले कोंडुस्कर गुरुवारी रात्री कारागृहातून बाहेर आले शुक्रवारी दुपारी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.
लोकसभा पोट निवडणुकीत रमाकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी आपली शक्ती उभा केली होती संयुक्त महाराष्ट्र चौकातील राऊत यांच्या जाहीर सभेत कोंडुस्कर यांनी धडाकेबाज भाषण केले त्यावेळी राऊत यांनी कोंडुस्कर यांचे कौतुक केलं होते या शिवाय कोंडुस्कर यांच्यामुळे समितीच्या मतदानाचा टक्का वाढला होता.त्यामुळे कोंडुस्कर यांच्याकडे राऊत यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.या पाश्र्वभूमीवर दोन्ही नेत्यांची सविस्तर झाली.यावेळी श्रीराम सेनेचे नंदू इंदलकर,शिवसैनिक जीवन कामत आदी उपस्थित होते.