शब्दगंध कवी मंडळ, बेळगाव यांच्या तर्फे ३१व्या वर्धापन दिनानिमित्त खुल्या काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. काव्य लेखन स्पर्धेमध्ये ‘स्वप्न’ या विषयावर बेळगाव, महाराष्ट्रसह बृहन्महाराष्ट्रामधून तब्बल तीनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला होता.
शब्दगंध कवी मंडळनी वेळोवेळी नवनवे उपक्रम राबवून साहित्य सेवा आणि भाषा , संस्कृती संवर्धनाचे कार्य गेल्या तीन दशकांपासून अविरतपणे केले आहे. काव्य मैफिल, काव्यवाचन, व्याख्याने, साहित्यावर चर्चा सत्र, प्रत्यक्ष साहित्यिक , विचारवंत, कवी, लेखकांना कार्यक्रमामध्ये आमंत्रण करून त्यांचे मार्गदर्शन बेळगांवकरांना वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत; याच्या अगोदर कवितासंग्रह उत्तम साहित्य कृतींची निवड करून त्यांना त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण अनेक वर्षे केलेले आहेत.
साहित्य चळवळ ही अशीच उत्तम रीतीने बेळगावकरांना प्रेरीत करत राहील यात शंका नाही. कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात खंड न पडता ऑनलाईन उपक्रम आणि थोडे ओसरल्या नंतर ऑफलाईन उपक्रम, मासिक बैठका, कार्यक्रम, काव्यवाचन, साहित्यावर चर्चा करण्यात आल्या. भाषा आणि भाषेचे संवर्धन करण्यासाठी अशा विविध माध्यमातून जागृती करण्याचे कार्य केले आहे. हे सर्व रसिकांच्या हृदयात अभंग कवितेचे नाते जपण्याचे कार्य केले आहे.
*सोमवार दि. २१ फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी . ५.०० वाजता.* काव्य लेखन स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण समारांभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम कवयित्री *वंदना कुलकर्णी यांच्या निवासस्थानी ‘चैत्र’ पहिला क्राॅस चिदंबरनगर, महाराजा अपार्टमेंटच्या मागे* येथे होणार असून कवीं कवयित्रीनी तसेच बेळगांव येथील रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दगंध कवी मंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी, सचिव कवी सुधाकर गावडे, खजिनदार कवी प्रा. निलेश शिंदे यांनी केले आहे.
* शब्दगंध कवी मंडळातर्फे घेण्यात आलेल्या *काव्य लेखन स्पर्धेचा* निकाल जाहीर
*खुला विभाग*
प्रथम – डॉ प्रभाकर शेळके, जालना –
द्वितीय – गुरुनाथ मनोहर किरमटे, बेळगाव –
तृतीय – नरेश अर्जुन सुर्वे, कोवाड –
उत्तेजनार्थ १ – सौ कल्पना मंगेश कुंभार, इचलकरंजी –
उत्तेजनार्थ २- आदिती निंगप्पा आवडण , बेळगाव –
*बेळगाव विभाग*
प्रथम – मंथन जुवेकर, बेळगाव –
द्वितीय – सुनिधी होणगेकर –
तृतीय – सुलोचना पाटील, बेळगाव