महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना आता rt-pcr चाचणीची गरज लागणार नाही. असा आदेश कर्नाटक सरकारने दिला आहे.
यासंदर्भातील आदेश आज कर्नाटक सरकारतर्फे जारी करण्यात आला आहे .कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मुख्य सचिव अनिल कुमार यांनी हा आदेश बजावला आहे.
या पुढील काळात कर्नाटकात प्रवेश करणार्या महाराष्ट्रातील नागरिकांना विमान, रेल्वे, बस किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने येताना कोणत्याही प्रकारे rt-pcr चाचणीची सक्ती केली जाणार नाही. असे आदेशात म्हटले आहे.
त्याचबरोबर कोविड लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल. याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा आदेश आल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नजीकच्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बेळगावची बाजारपेठ महाराष्ट्रातील तालुक्यांवर अवलंबून आहे. यामुळे व्यापारी वर्गाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन ही विनंती केली होती. याचबरोबरीने कर्नाटकाच्या विविध सीमाभागात लागून असलेल्या राज्यातून विशेषता केरळ मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने तेथूनही या संदर्भात मागणी होती. दरम्यान सध्या महाराष्ट्र संदर्भात हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दिलासा मिळाला आहे.