गॅरेज मधील काम संपवून घरी परत जाणाऱ्या युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान न्यु गांधी नगर परिसरात घडली आहे.
मोहम्मद कैफ बागवान वय 17 असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी भेट देऊन माहीत घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांत खेळताना वाद झाला होता त्या वादातून मोहम्मद कैफ वर हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.