Monday, December 23, 2024

/

‘त्या शिवमूर्तीला दुग्धभिषेक घातलेल्याअमोल कोल्हे यांचा बेळगावात सन्मान’

 belgaum

माझ्या राजाची विटंबना झालेल्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालणे शिवगर्जना करणं ही एक शिवभक्त म्हणून भावना होती. महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून बंगळुरूत शिवजयंती दिनी त्याच पुतळ्याला दुग्धभिषेक केला.बेळगावातील लोकांना पूर्व कल्पना न देता गनिमी काव्याने सकारात्मक संदेश देत आम्ही बंगळुरूत शिव पुतळ्याचा अभिषेक केला आहे त्याच ठिकाणी शिवगर्जना केली असे मत अभिनेते खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

बेळगाव पुणे बंगळुरू हायवे वरील कोंडुस्कर भवन येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.शनिवारी अमोल कोल्हे आणि सहकाऱ्यांनी बंगळुरू येथे अवमान झालेल्या शिवपुतळ्याला अभिषेक घातल्यावर पुणे येथे जाताना त्यांनी बेळगावला धावती भेट दिली. कोंडुस्कर भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्री राम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्ती समिती खजिनदार प्रकाश मरगाळे, राष्ट्रवादीचे मेहबूब शेख,आदिल फरास आदी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी होत असताना बंगळुरूत केलेली शिवगर्जना उत्साही ऊर्जा देणारी ठरली आहे.ज्या पुतळ्याला अभिषेक घातला त्याच पुतळ्याला 1994 साली शरद पवार साहेबांनी 25 लाखांची देणगी दिली होती याचाही अभिमान असल्याचं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

Amol kolhe

दुर्गामाता दौड, शंभू राजे नाटक,मराठी टायगर्स सिनेमा नंतर आज मी बेळगावात आलोय.सीमा भागातील मराठी गळचेपी विषयी आवाज उठवण्यासाठी नेहमी बेळगाव वासीयांच्या पाठीशी राहीन असे आश्वासन दिले.घटनात्मक पद्धतीनं आपल्याला पुढे जायला लागेल असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर यांनी बंगळुरु तील त्या अवमान झालेल्या शिवपुतळ्याला दुग्धभिषेक करून बेळगावातील शिवप्रेमींची इच्छा पूर्ण केली असल्याचे सांगत आम्ही 47 दिवस कारागृह सोसलेल्या युवकांची मागणी त्यांनी केली आहे असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी शेकडो शिव प्रेमी,म ए समिती आणि श्री राम सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.