हिजाब प्रकरणी तीन दिवस राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करताना कर्नाटक सरकारने आणखी एक नवीन आदेश काढला आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याच्या अपर सचिव पद्मिनी एस एन यांनी राज्यातील 9 ते 11 फेब्रुवारी तीन दिवस इयत्ता नववी दहावी आणि सर्व कॉलेजना सुट्टी देण्याचा आदेश काढला आहे.
सुरुवातीला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत हायस्कुल आणि कॉलेजना सुट्टी देण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर उच्च शिक्षण खात्याच्या अपर सचिव शीतल हिरेमठ यांनी पहिली ते सातवी वगळता सर्व हायस्कुल कॉलेजना सुट्टीचा आदेश काढला होता त्यानंतर आता पुन्हा आदेशात बदल झाला असून आठवीचा वर्ग देखील सुरू असणार आहे.
दरम्यान कर्नाटक राज्यातील सर्व शाळा-कॉलेजच्या विद्यार्थी शिक्षक मॅनेजमेंट आणि सर्व शाळा कॉलेजेस तसेच जनतेने देखील हिजाब प्रकरणी शांतता राखावी कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे.