Wednesday, December 25, 2024

/

विमानतळावरील ‘या’ नव्या यंत्रणेचे काम लवकर होणार पूर्ण

 belgaum

बेळगाव विमानतळावरील इंस्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीमचे (आयएलएस) काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यावर कॉर्पोरेट हेडकॉर्टर आणि एएआय नवी दिल्लीच्या विशेषज्ञानचे पथक काम करत असल्याची माहिती बेळगाव विमानतळाच्या संचालकांनी ट्विटद्वारे दिली आहे.

बेळगाव विमानतळाच्या झपाट्याने विकास होण्यास उडान योजना कारणीभूत आहे. दर वर्षी या विमानतळावरील प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे बेळगाव विमान तळाचा विकासाचा कल 300 टक्क्याहून अधिक आहे.

या विमानतळावरील विमानांच्या अलगद लँडिंग आणि टेक ऑफच्या दर्जामध्येही सुधारणा होत आहे. बेळगाव विमानतळावरून नवी दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, जयपुर, इंदोर, अजमेर, तिरुपती आदी प्रमुख शहरांना विमानसेवा सुरू असल्यामुळे या विमानतळाचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे.

Ils system air port
Ils system air port

इंस्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) ही अतिशय अचूक रेडिओ सिग्नल नेव्हीगेशन मदत यंत्रणा आहे. या यंत्रणेला दोन अँटिना असतात जे अवकाशातील विमान धावपट्टीवर व्यवस्थित उतरावे यासाठी सांकेतिक संदेश विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. खराब हवामानाप्रसंगी कमी दृश्यमानता असते त्यावेळी हे अँटिना वैमानिकाला अनुलंब आणि क्षैतजक (व्हर्टिकल अँड होरिझाॅन्टल) मार्गदर्शन करतात.

उड्डाण करणाऱ्या विमानांच्या बाबतीत आयएलएस यंत्रणा वापरली जात नाही. बेळगाव विमानतळावर सुरू असलेल्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमचे काम सध्या सुरू असून गेल्या 31 जुलै 2020 रोजी सुरु होणारे या सिस्टीमचे काम कोरोना प्रादुर्भावामुळे प्रलंबित राहिले होते. मात्र त्यानंतर प्रगतीपथावर असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.