हिजाब प्रकरणाचे पडसाद कर्नाटक राज्यासह देशभरात उमटू लागले आहेत त्यासाठी खबरदारी म्हणून बेळगाव शहरातील मोठमोठ्या शाळा कॉलेज महाविद्यालयासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
उडुपी येथील कुंदापूर मधील एका कनिष्ठ महाविद्यालय मध्ये हिजाब घालून कॉलेज मध्ये प्रवेश करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला त्या नंतर या वादाला तोंड फुटले आणि वातावरण तणावपूर्ण बनले आहे त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने देखील राज्यात नववी दहावी आणि कॉलेजला तीन दिवसाची सुटी देखील जाहीर केली आहे.
आता बेळगाव शहरातील अनेक शाळा कॉलेज आणि महाविद्यालयातील बंदोबस्त देण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिजाबला आपला विरोध म्हणून राज्यातील काही कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भगवे फेटे परिधान केले होते त्यानंतर विरोधाला सामोरं जावं लागलं होतं आणि वातावरण तणावपूर्ण बनले होतं त्यासाठी बेळगाव या पार्श्वभूमीवर बेळगाव मध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
बेळगाव शहरात इयत्ता पहिली ते आठवीचा वर्ग सुरू राहिले होते मात्र नववी दहावी आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे
तरीही पूर्व खबरदारी म्हणून महत्त्वाच्या कॉलेज समोर पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता आहे बेळगाव शहरातील आरपीडी जीएसएस गोटे लिंगराज आल्यास ज्योती कॉलेज सरदार शेट्टी आदी महाविद्यालयासमोर पोलिस तैनात करण्यात आले होते.