बेळगाव जिल्ह्यामध्ये अलीकडेच केंद्रनिहाय मतदान नोंदणी पार पडली. त्यासाठी अनेक शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती झाली होती.
बसवान गल्ली शहापूर येथील शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका गीता शंकर पवार यांनी या मतदार नोंदणी कार्यात उत्तम कामगिरी बजावल्याने प्रशासनातर्फे त्यांचा नुकताच प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
वाघवडे येथील सरकारी मराठी शाळा, बेळगावातील शाळा क्र. 24 आणि शहापूर येथील मराठी शाळा क्र. 16 या शाळांमध्ये गीता शंकर पवार यांनी 24 वर्षे काम केले आहे.
कोरोना काळातही त्यांनी उत्तम प्रकारे मतदार नोंदणीचे काम केल्याबद्दल प्रशासनाच्यावतीने त्यांचा अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमाठ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल प्रभारी मुख्याध्यापिका गीता पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.