युक्रेनमधून भारतात येण्यासाठी विमानसेवा नाही. भारताकडून ती विमानसेवा सुरू केली जावी यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी प्रयत्नशील आहेत. तिथे अडकून पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री गोविंद करतो म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची माहिती घेतली असून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.
युक्रेनमध्ये अडकून पडलेले भारतीय सुरक्षित परतावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यासंदर्भात चार दिवसापूर्वीच भारत सरकारने युक्रेन सरकारला विनंती केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील संबंधित दोन विद्यार्थी अलीकडेच उच्च शिक्षणासाठी युक्रेनला गेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून जिल्हाधिकारी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत, असे मंत्री कारजोळ यांनी पुनश्च स्पष्ट केले.