बेळगाव आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात ५१ नवे कोविड रुग्ण आढळले असून आजच्या नव्या रुग्णांच्या संखेनंतर जिल्ह्याची कोविड आकडेवारी ९९९०४ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत एकूण १८९९३९८ चाचण्या घेण्यात आल्या असून यापैकी १७९११६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ९९९०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
५३० रुग्ण रुग्णालय आणि होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत तर आतापर्यंत ९९७ जणांना आपला जीव कोविडमुळे गमवावा लागला आहे. आतापर्यंत तब्येतीत सुधारणा होऊन ९८३७७ रुग्ण बरे झाले आहेत.
तर अजूनही ५३० रुग्ण उपचार घेत आहेत. ३१३९ जणांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. बेळगाव जिल्ह्यात आज एका ६५ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या ५१ रुग्णांमध्ये अथणी, गोकाक आणि हुक्केरी येथे प्रत्येकी ५, बेळगाव तालुक्यातील ११, बैलहोंगल मधील १, चिकोडी आणि खानापूरमध्ये प्रत्येकी ३, रामदुर्ग मधील ४, रायबाग मधील ७, सौंदत्ती मधील ६, आणि इतर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.