Tuesday, December 24, 2024

/

खानापूर रोडवरील स्टेट बँकेच्या कार्यालयाला आग

 belgaum

बेळगाव खानापूर रोड येथील स्टेट बँकेच्या कार्यालयात आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली असून तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान या आगीत कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

बेळगाव खानापूर रोड येथील स्टेट बँक बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाच्या वरील बाजूस निलगिरीच्या झाडाचा पालपोचला जमा झाला होता. या पाल्यापाचोळ्याला नजीकच असलेल्या वीजतारेचा स्पर्श होऊन शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती.Fire sbi bgm

या पाल्यापाचोळ्यामुळे ही आग अधिकच पसरल्याचे दिसताच बँक कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने धाव घेत सदर आग वेळीच आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून यादरम्यान बँक कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले.

अग्निशमन दलाचे अधिकारी टकेकर आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली सुदैवाने कोणतीही हानी या घटनेमुळे झाली नाही मात्र अग्निशामक दलाचा सतर्कपण यावेळी दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.