Tuesday, December 24, 2024

/

‘दोघांचे जीव वाचवणाऱ्या डेरिंगबाज लोको पायलटचा रेल्वेला अभिमान’

 belgaum

धावत्या रेल्वेत फरफटत जाणाऱ्या बाप लेकीचा जीव वाचवणाऱ्या लोको पायलटचा समस्त रेल्वे विभागाला अभिमान वाटतो आहे कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून दोघांचे जीव वाचवण्याचे साहसी कार्य त्याच्या हातून घडले आहे अशी स्तुतीसुमने रेल्वे अधिकारी बॉडी बिल्डींगचे कोच सुनील आपटेकर उधळली आहेत.
बेळगाव रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वे सोबत फरपटत जाणाऱ्या बापलेकीचा जीव वाचवणाऱ्या अनिरब गोस्वामी या लोकोपायलटचा आज सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.त्यावेळी सुनील यांनी वरील उदगार काढले.

बेळगाव रेल्वे स्थानकावर काल शनिवारी सकाळी 11च्या सुमारास अजमेरहून बेंगलोरला जाणारी दाखल झाली. आईस्क्रीम घेण्यासाठी एक मुलगी व तिचे वडील स्थानकात उतरले. आईस्क्रीमच्या खरेदीच्या नादात रेल्वे केव्हा सुरू झाली त्याचा पत्ताच त्या दोघांना लागला नाही. रेल्वे सुरू झाल्याने लक्षात येताच त्यांनी बोगीकडे धाव घेतली. परंतु रेल्वेची तोपर्यंत गती वाढली असल्याने ते दोघेही रेल्वे सोबत फरफटत गेले.

मात्र प्रसंगावधान राखून शेजारीच ड्युटी संपून उभ्या असणाऱ्या लोको पायलट अनिरब गोस्वामी यांनी तात्काळ पुढे धाव घेऊन रेल्वे खाली सापडण्याच्या बेतात असलेल्या त्या दोघा बाप लेकीना बाहेर खेचले व जीव वाचवला.लोको पायलट अनिरब यांच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली असली तरी त्यांच्या साहसी कार्याचे कौतुक होत आहे.मारवाड हुन बंगळुरूला सानवी आणि तिचे वडील मनीष या दोघांचा जीव अनिरब यानें वाचवला आहे. Loco pilot feliciation

लोको पायलट अनिरब गोस्वामी यांनी आपला जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता दाखवत दोघांचे जीव वाचवल्या बद्दल आज रविवारी सकाळी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे गोस्वामी यांचा बेळगाव रेल्वे स्थानकावर सत्कार करण्यात आला.

अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी पुष्पहार घालून शाल व श्रीफळ देऊन गोस्वामी यांना सन्मानित केले. याप्रसंगी रेल्वेचे तिकीट तपासणी अधिकारी सुनील आपटेकर यांनी लोको पायलट अनिरब गोस्वामी यांनी बापलेकीचा जीव वाचवण्याचे जे धाडस दाखवले त्याचा रेल्वे खात्याला अभिमान आहे.

गोस्वामी यांनी दाखविलेल्या धाडसाची दखल घेऊन त्यांना सरकारकडून एखादा पुरस्कार दिला गेला पाहिजे असे मत देखील आपटेकर यांनी व्यक्त केले. सुरेंद्र अनगोळकर यांनीही यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. सत्काराप्रसंगी अनगोळकर फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.