रायचूर जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या जवानाच्या आईचा निघृण खून करणाऱ्यांना तात्काळ गजाआड करावे, अशी मागणी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेने केली आहे.
अखिल कर्नाटक माजी सैनिक संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक आणि निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
रायचूर जिल्ह्यातील अंगसगुरु तालुक्याच्या हट्टिय गावामध्ये सीमा सुरक्षा दलाचा जवान अमरेश आणि त्याच्या आईवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
याप्रसंगी जवळपास 20 जणांनी अमरेश याच्या आईची निघृण हत्या केली. देशाच्या सीमेवर देश रक्षणार्थ आपले प्राण देण्यास तयार असलेल्या जवानांसह त्यांचे कुटुंबीय स्वतःच्या देशामध्ये मात्र असुरक्षित असल्याचे यावरून स्पष्ट होते शुल्लक कारणावरून अमरेश व त्याच्या आईवर करण्यात आलेला हल्ला निषेधार्ह आहे तेव्हा अमरेशच्या आईच्या खून प्रकरणाचा कसून तपास करावा आणि आरोपींना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे भविष्यात सैनिकांना आणि माजी सैनिकांना त्यांच्या कुटुंबासह कायद्याचे संरक्षण देऊन त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारकडून घेतली जावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बसप्पा तळवार यांच्यासह उपाध्यक्ष विरुपाक्ष तीळगंजी, सचिव नागप्पा कळसन्नावर, सहसचिव शिवरायप्पा गुरुवन्नावर, अरुण मुरगोड, प्रकाश मारिहाळ, बसप्पा कसळ्ळी, शिवबसप्पा काडन्नावर, विजय नायकर, बाबू बसप्पगोळ, शिवप्पा कोलकार, संतोष मल्लापूरे आदी माजी सैनिक उपस्थित होते.