Monday, November 18, 2024

/

बनावट आरटी -पीसीआर : मुख्य सूत्रधार गजाआड

 belgaum

आरटी -पीसीआर करून घेण्याच्या सरकारी आदेशाचा गैरफायदा केल बनावट आरटी -पीसीआर रिपोर्ट तयार करून प्रवाशांना कर्नाटकात जाणाऱ्या कोल्हापूर येथील एका रॅकेटचा पर्दाफाश करण्याबरोबरच निपाणी पोलिसांनी त्या रॅकेटच्या म्होरक्याला आज गजाआड केले.

कोरोना महामारी व ओमिक्राॅन रोगांचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना आरटी -पीसीआर तपासणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रवाशांकडून दाम दुप्पट पैसे उकळण्याचे प्रकार निपाणी पोलिसांच्या या स्टिंग ऑपरेशन वजा कारवाईत उघडकीस आले आहे. पोलिसांनी गजाआड केलेल्या बनावट आरटी -पीसीआर रॅकेटच्या प्रमुखाचे नांव अब्रार मुस्ताक जमादार (वय 32, रा. विक्रमनगर कोल्हापूर) असे आहे.

निपाणी पोलिसांनी सापळा रचताना नागरी वेशामध्ये कोल्हापूर येथील बस तिकीट बुकिंग कार्यालयात बेळगावच्या तिकिटांची चौकशी केली. बुकिंग ऑफिसमधील व्यक्तीने त्यांना तिकीट आणि आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्रही दिले.

त्यानंतर कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी संबंधित बस अडवून बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली असता तिघा जणांकडे बनावट आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र आढळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुख्य आरोपी अब्रार याला निपाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

चिक्कोडीचे पोलीस प्रमुख बसवराज यलिगार आणि निपाणी विभागीय पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल कुंभार, पी. एम. गस्ती, अमर चंदनशिव, शेखर असोदे व राजू नदा यांचा उपरोक्त पोलीस कारवाईत सहभाग होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.