बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध प्रकल्पांचा आज गुरुवारी (ता. 24) जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंदा कारजोळ यांनी आढावा घेतला. शहरातील सी.बी.टी.विविध रस्ते, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, टिळकवाडी आर्ट गॅलरी आदी कामांची त्यांनी पाहणी केली.
मध्यवर्ती बस स्थानकाचे काम 2018 सुरू झाले आहे.या कामाला एक वर्षाचा विलंब झाला.याठिकाणी 28 बस पार्किंग प्लेटफार्म, सर्व अत्याधुनिक सुविधा,व्यापारी संकुल, रेस्टॉरंट आणि इतर सुविधा पुरवत असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मंत्री गोविंद कारजोळ यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट दिली. कमांड अँड कंट्रोल सेंटर 46 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले आहे.येथून बसेस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवां वाहनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे असे स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ प्रवीण बागेवाडी यांनी सांगितले.
शहरात फिरणाऱ्या 67 परिवहन बसेसमध्ये जीपीएस, दहा बस निवारे, कॅमेरे आणि स्मार्ट बस निवारे आहेत.
कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 20 ठिकाणी कॅमेरे बसवीण्यात आले आहेत.
दरम्यान, कामांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कारजोळ म्हणाले, अतिवृष्टीमुळे स्मार्ट सिटीची कामे दोन वर्षांपासून रखडली आहेत.डिसेंबर महिन्या अखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. टिळकवाडीत ४३.६२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे.याकामाला वर्षभराचा विलंब झाला आहे. प्रकल्पाची कायदेशीर अडचण दूर करून येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असेही कारजोळ यांनी सांगितले.
खास. मंगला अंगडी,,जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ,स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी,मनपा आयुक्त डॉ रुद्रेश घाळी आदी यावेळी उपस्थित होते.