देसूर येथे रस्ते कामकाजाचा शुभारंभ कार्यक्रम बेळगाव ग्रामीण मतदार आमदारांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या कार्यक्रमासाठी रोजगार हमी योजनेंर्तगत काम करणाऱ्या जवळपास २५० ते ३०० महिलांना जबरदस्तीने कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
ग्रामपंचायत पिडिओंचा नकार असूनही या महिलांना या कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी बोलाविण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व पाहुणे मंडळी ग्राम पंचायत कार्यालयात गेली असता एका ग्रामपंचायत सदस्य चक्क ग्राम पंचायत अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
ग्राम पंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या आसनावर इतर कुणालाही बसण्याची परवानगी नसते. परंतु सदर सदस्य ग्रामपंचायत अध्यक्षांच्या आसनावर विराजमान झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.