बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी नव्याने 20 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 1,00,037 इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 193 इतकी झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 20 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज शनिवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 1,00,037 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 19,15,881 व्यक्तींच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
आज शनिवारी नव्याने 20 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तपासणी करण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या स्वॅबच्या नमुन्यांपैकी यापैकी 18,08,714 नमुने कोरोना निगेटिव्ह असून 1,00,037 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात हॉस्पिटल आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची संख्या 193 इतकी आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची (ॲक्टिव्ह रुग्ण) संख्या 193 इतकी असून आत्तापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून 98,846 रुग्ण मुक्त झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज शनिवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 5, चिक्कोडी 1, सौंदत्ती 4, अथणी 2, बैलहोंगल 3 आणि रायबाग 5 अशा एकुण 20 रुग्णांचा समावेश आहे.