धनादेश न वटल्याप्रकरणी धारवाड येथील प्रतिष्ठित महाविद्यालयाचे प्राचार्य दुर्गप्पा करडोनी यांना बेळगाव जिल्हा गोकाक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट बजावले आहे.
गोकाक येथील विठ्ठल नामक व्यक्तीकडून दुर्गप्पा करडोनी यांनी ३ लाख रुपये घेतले होते. सदर पैशाची परतफेड करण्यासाठी धनादेश देण्यात आला.
धनादेश देण्यात आलेल्या अकाउंटमध्ये पैसे नसल्या कारणाने सदर धनादेश वटला नाही. यामुळे विठ्ठल यांनी गोकाक न्यायालयात याचिका दाखल केली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गोकाक जेएमएफसी न्यायालयाने करडोनी यांना अटक वॉरंट बजावले आहे. २२ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्याची सूचना हुबळी धारवाड पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे.