येळ्ळूर येथे (ता. जि . बेळगाव आयोजित ग्रामीण भागासाठी मर्यादीत भव्य बक्षीस रकमेच्या श्री गणेश चषक फुल्लपीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद चांगळेश्वरी स्पोर्ट्स संघाने पटकावले. बिडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
येळ्ळूर येथे काल रविवारी यशस्वीरित्या पार पडलेल्या श्री गणेश चषक हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यासाठी 51000/- चे प्रथम पारितोषिक व चषक आम्ही उपविजेत्यासाठी 25001/- व चषक असे बक्षीस पुरस्कृत करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत ग्रामीण भागातील 40 क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात चांगळेश्वरी स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी बीड संघाला पराजित करून श्री गणेश चषक हस्तगत केला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल, माजी ग्रा. पं. सुळगे येळ्ळूर अरविंद पाटील, प्रथम पारितोषिकाचे पुरस्कर्ते श्री गणेश प्लायवूड टिळकवाडी बेळगावचे प्रतीक मुगळीकर, द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलेले तिरुपती बालाजी मार्बल खानापूर रोड मजगावचे आकाश मांडा, येळ्ळूर ग्रा. पं. सदस्य, तसेच इतर मान्यवर व दानशूर व्यक्ती उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे मालिकवीर -उमेश गोरल (येळ्ळूर), उत्कृष्ट फलंदाज -परीक्षित मेनसे (येळ्ळूर), उत्कृष्ट गोलंदाज -मंजू पाटील (बिडी), उत्कृष्ट यष्टीरक्षक -सदानंद पोटे, अंतिम सामन्याचा सामनावीर -डॉ. संतोष पाटील. बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन चेतन हुंदरे व बाबू पिंगट यांनी केले. शेवटी राजू उघाडे यांनी आभार मानले.