माजी मंत्री रमेश जारकीहोळी अश्लील सीडीप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे.
गाजलेल्या अश्लिल सीडी प्रकरणात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना क्लीनचिट देणारा बी -रिपोर्ट अहवाल एसआयटीने उच्च न्यायालयाकडे सादर केला आहे. याच्या विरोधात संबंधित पीडित युवतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीने सादर केलेल्या अहवालाला स्थगिती आदेश दिला आहे. अश्लिल सीडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेले एसआयटी पथक योग्य नव्हते.
याप्रकरणी तपास देखील व्यवस्थित झालेला नाही. कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असा आरोप पीडित युवतीच्या वकिलांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे आता पुन्हा रमेश जारकीहोळी अडचणीत आले आहेत.