Thursday, January 30, 2025

/

सागरे श्री महालक्ष्मी यात्रेसाठी खानापूर आगाराची विशेष बस

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यानंतर सागरे व दोड्डेबैल येथील श्री महालक्ष्मी यात्रेसाठी खानापूर बस आगाराकडून सागरे गावाला आजपासून तात्काळ विशेष बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबद्दल खानापूर युवा समितीतर्फे प्रभारी आगार व्यवस्थापक महेश शेट्टनावर यांचे पुष्पहार घालून जाहीर आभार मानण्यात आले.

सागरे व दोड्डेबैल (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी यात्रा 16 वर्षानंतर यंदा होत असून या यात्रेला येणाऱ्या भाविक व पैपाहुण्याकरिता सोयीचे व्हावे यासाठी खानापूर बस आगारामधून तात्काळ बससेवा उपलब्ध करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आली होती. यासाठी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच खानापूर बस आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले होते.Ksrtc bus remote village

खानापूर बस आगाराचे प्रभारी व्यवस्थापक महेश शेट्टनावर यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे होते. त्यासंदर्भात आज युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा महेश शेट्टनावर यांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ आज सोमवारपासून सागरे व दोड्डेबैल येथील श्री महालक्ष्मी यात्रेसाठी बस उपलब्ध करून दिली आहे.

 belgaum

याबद्दल त्यांचा युवा समितीतर्फे पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. त्याच प्रमाणे बस चालक आणि वाहकाचे देखील पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.