महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.अरविंद पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर खानापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांत कोणतेच मतभेद नाहीत.अरविंद पाटील यांनी भाजपच्या ध्येय धोरणांचा आणि राष्ट्रीयत्वाचा स्वीकार करत, भारतीय जनता पक्ष विनाशर्त प्रवेश केला आहे. अशी माहिती बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आज गुरुवारी सकाळी खास.मंगला अंगडी यांच्या पत्रकार परिषदेला संजय पाटीलही उपस्थित होते. यावेळी अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात पत्रकारांनी संजय पाटील यांना अनेक प्रश्न विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.
खानापूर तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी महिन्याभरापूर्वीच अरविंद पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेशासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. खानापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना अरविंद पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती होती असे पाटील म्हणाले.
अरविंद पाटील हे पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते असले तरीही आता त्यांनी भाजपच्या ध्येयधोरणांचा आणि राष्ट्रीयत्वाचा स्वीकार करून भाजप पक्षात प्रवेश केला आहे.
पक्षात प्रवेश करताना अरविंद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी बरोबरच अन्य कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. संजय पाटील यांनी स्पष्ट केले.