रेल्वेच्या पिंक बुकमध्ये सुरू असलेले प्रकल्प आणि हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे त्यामध्ये भारतीय रेल्वेच्या विभिन्न विभागांची इत्थंभूत माहिती असते. यंदाच्या रेल्वे पिंक बुकमध्ये बेळगावातील कांही प्रकल्पांचाही अंतर्भाव आहे.
केंद्रात एकदा का रेल्वे अर्थसंकल्प मंजूर झाला की प्रकल्पांशी संबंधित प्राथमिक कामांचा शुभारंभ करण्याचा अधिकार पिंक बुकला प्राप्त होतो. अर्थसंकल्पाची घोषणा झाली की आपण वाहवत जात असलो तरी पिंक बुक पाहिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा वास्तविक हेतू आपल्या ध्यानात येतो. रेल्वेच्या यंदाच्या पिंक बुक 2022 -23 मध्ये बेळगावच्या पुढील प्रकल्पांचा समावेश आहे. (आकडे हजारो रुपयांमध्ये)
नवे रेल्वे मार्ग : बागलकोट -कुडची (142 कि.मी.) -20,00,00. कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड (73.10 कि.मी.) -20,00,01. दुपदरीकरण : होसपेट -हुबळी लोंढा -तिनईघाट -वास्को-द-गामा (352.28 कि.मी.) -400,00,00. वाहतूक सुविधा, यार्ड नूतनीकरण आणि इतर कामे : आंबेवाडी येथे सिग्नल व्यवस्था, रेल्वेस्थानक इमारत, आणि अळनावर ते आंबेवाडी दरम्यान पॅसेंजर रेल्वे धावण्यासाठी संपर्क व्यवस्था.
रेल्वे सुरक्षा कामे -रोड ओव्हर /अंडर ब्रिज : लेव्हल क्रॉसिंग क्र. 382 येथील देसुर -बेळगाव रोड ओव्हर ब्रिज -3,00,00. लेव्हल क्रॉसिंग क्र. 383 येथील देसुर -बेळगाव रोड ओव्हर ब्रिज -3,00,00. लेव्हल क्रॉसिंग क्र. 381 येथील बेळगाव -सांबरा रोड ओव्हर ब्रिज 50,00. लेव्हल क्रॉसिंग क्र. 438 येथील रायबाग -चिंचली रोड ओव्हर ब्रिज 10,00. खानापूर उगारखुर्द टीएफआर 125 कि.मी. -460.