मुलांना शाळेला घेऊन जाणारी ऑटोरिक्षा पलटी झाल्यामुळे घडलेल्या अपघातात शाळकरी मुले जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी सुरभी हॉटेलनजीक घडली.
शहरातील सुरभी हॉटेलनजीक आज सकाळी मुलांना शाळेला घेऊन जाणारी एक ऑटोरिक्षा पलटी झाली. सदर अपघातामुळे रिक्षातून जाणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींपैकी कांहीजण जखमी झाले.
जखमी मुलांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सदर मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला याची निश्चित माहिती मिळू शकली नाही.