Wednesday, November 20, 2024

/

आत्महत्या नव्हे, आमच्या मुलीचा खून : नातेवाईकांचा आरोप

 belgaum

बेळगाव शहरातील आरगण तलावामध्ये उडी घेऊन क्रिशाने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली नसून तिचा पद्धतशीरपणे खून करण्यात आला असल्याचा आरोप मयत क्रीशा मनीष केशवानी हिच्या आई आणि भावासह समस्त कुटुंबीयांनी केला असून नवरा व सासरच्या मंडळींनी बळी घेतलेल्या आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

क्रीशा मनीष केशवानी या 36 वर्षीय महिलेने आपल्या भावीर आणि विरेन या दोन मुलांसह अरगण तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली होती. आपल्या दोन मुलांसह आईने तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

क्रीशाचे माहेर मिरज (जि. सांगली) येथे आहे. माहेरी तिला आईसह एक भाऊ आणि सहा बहिणी असा परिवार आहे. बेळगावात आज शनिवारी सकाळी दाखल झालेल्या क्रीशा हिच्या मिरज येथील माहेरच्या शोकाकुल लोकांची सिव्हिल हॉस्पिटल शवागाराच्या ठिकाणी ठिकाणी प्रसारमाध्यमांनी भेट घेतली असता त्यांनी उपरोक्त आरोप केला. मयत क्रीशा केशवानी तिचा भाऊ अभिजीत याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार क्रीशा हिचा बेळगावच्या मनीष केशवानी त्याच्याशी विवाह होऊन 9 वर्षाचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत सातत्याने क्रीशाला तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. आपल्याला अतिशय त्रास दिला जात असल्याची माहिती क्रीशा घरच्या मंडळींना देत होती. क्रिशाचा छळ करण्याबरोबरच तिला कायम माहेरच्या मंडळींपासून दूर ठेवले जात होते. गेल्या आठ दिवसांपासून क्रीशाचा मोबाईल फोन तिच्या सासरच्या मंडळींनी काढून घेतला होता. तिला आपल्या माहेरच्या मंडळींशी मिरजला संपर्क साधण्यास मनाई केली जात होती. मोबाईल फोनबद्दल विचारणा केल्यास तो खराब झाला असल्याचे सांगितले जात होते.

क्रिशा आणि तिची दोन मुले तलावात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना उजेडात येण्यापूर्वी काल शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास क्रीशाचा पती मनीष याने तिच्या माहेरी मिरजेला फोन केला होता. फोनवर त्याने क्रीशा आज सकाळी मुलांना शाळेला सोडण्यासाठी गेली. परंतु मुले शाळेत पोहोचलेली नाहीत आणि क्रीशाचाही पत्ता नाही. ती कुठे गेले हे कळण्यास मार्ग नाही. मी शोधाशोध करत आहे, तुमच्याकडे ती आली असल्यास आम्हाला कळवावे किंवा तुमच्या नातेवाईकांकडे तिची चौकशी करावी असे मनीषने मयत क्रीशाच्या माहेरच्या मंडळींना सांगितले. मनीषाचा फोन येऊन गेल्यानंतर अवघ्या कांही तासात क्रीशाचा मृतदेह आरगन तलावात आढळला. हा एकंदर प्रकार संशयास्पद असून माझ्या बहिणीचा तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी खून केला आहे असे अभिजित यांनी सांगितले. जिवंत व्यक्ती पाण्यात बुडाली तर मृतदेह लवकर पाण्यावर येत नाही. माझ्या बहिणीचा मृतदेह मात्र तीन -चार तासात पाण्यावर कसा तरंगू शकतो याचा अर्थ तिचा खून करून तिला पाण्यात टाकण्यात आले आहे असे अभिजीत देण्याचे स्पष्ट केले.Miraj krisha

मयत क्रोशाच्या आईने देखील क्रीशाला तिच्या सासरच्या मंडळीकडून खूप छळ केला जात होता. आपल्याला सासरी सुख मिळत नसल्याची तक्रार ती सातत्याने माझ्याकडे करत होती. आमच्या एका जावयाला आम्ही 8 लाख रुपयांची मदत करण्याचे ठरवले होते ते पैसे आपल्याला मिळावेत अशी मागणी क्रिशाचा पती तिच्याकडे करत होता. अलीकडेच माझ्या पतीचे निधन झाले. याचा फायदा घेऊन क्रीशाच्या सासरची मंडळी तिला अधिक त्रास देत होती. अलीकडे तिचा मोबाईल फोन देखील काढून घेण्यात आला होता.

माझ्या मुलीने आपल्या पोटच्या मुलांसह आत्महत्या केली नसून तिचा नक्कीच खून करण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार मयत क्रीशा केशवानी हिची माहेरची मंडळींनी आज थेट कॅम्प पोलीस स्थानक गाठून खुनाची तक्रार नोंदविली आहे. त्याचप्रमाणे आज ते पोलिस आयुक्तांची देखील भेट घेणार असून क्रिशाचा केला जाणारा छळ आणि तिच्या खुनाचा संशय याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे समजते. कॅम्प पोलिस स्थानकाच्या ठिकाणी मयत क्रिशा केशवानीच्या नातलगांनी बेळगावच्या स्थानिक सिंधी समाज प्रमुखांकडे देखील आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.