जोपर्यंत मनीष केशवानी याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही क्रिशा केशवानी व तिच्या मुलांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा आरगन तलावामध्ये आपल्या दोन मुलांसह आत्महत्या करणाऱ्या क्रिशाच्या माहेरच्या मंडळींनी घेतला आहे. याउलट क्रिशाच्या चुलत दिराने अनैतिक संबंधातून हा आत्महत्येचा प्रकार घडला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
सह्याद्रीनगर येथील क्रिशा मनीष केशवानी (वय 36) या विवाहितेने आपली दोन मुले भावीर (वय 4) आणि विरेन (वय 7) यांच्यासह अरगन तलावात उडी टाकून आपले जीवन संपविले होते शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत क्रिशा व भावीर यांचे मृतदेह सापडले. त्यानंतर काल शनिवारी विरेन या मुलाचा मृतदेह तलावात सापडला. शनिवारी तीनही मृतदेहांवर सिव्हील हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. तथापि कालपासून बेळगावात दाखल झालेल्या क्रिशा केशवानी हिच्या माहेरच्या मंडळींनी जोपर्यंत क्रिशाचा पती मनीष केशवानी याला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, मनीष केशवानी याच्या कुटुंबीयांनी मनीषच्या चुलत भावाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेऊन क्रिशाने हिने आपले अनैतिक संबंध उघड होणाऱ्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. क्रिशा हिचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यासंबंधीचा पुरावा देखील आमच्याकडे आहेत.
आमच्याकडे असलेल्या पुराव्यांची कुणकुण लागताच आपले अनैतिक संबंध हे संबंध उघड होणार या भीतीपोटी क्रिशाने आपल्या मुलांसह आत्महत्या केल्याचा आरोप मनीषचा चुलत भाऊ दिनेश केशवानी याने पत्रकार परिषदेत केला आहे.
क्रिशाची माहेरची मंडळी करत असलेले सर्व आरोप खोटे असून त्याची चौकशी केली जावी आणि आमची फिर्याद नोंदवून घेतली जावी. त्याचप्रमाणे माणुसकीच्या दृष्टिकोनातून मृत तिघा जणांचे मृतदेह फार काळ शवागारात न ठेवता एक तर मिरजहून आलेल्या मंडळींना अथवा आम्हाला मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली जावी अशी मागणी दिनेश याने केली आहे.
क्रिशा हिचे लग्नापूर्वीपासून एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. गेल्या 5 फेब्रुवारी रोजी क्रिशाच्या बहिणीच्या नवऱ्याने त्यासंदर्भातील ऑडिओ पुरावा मनीषला धाडला होता. मनीषने त्यासंदर्भात शांतपणे क्रिशाला जाब विचारला होता. सासरी क्रिशाचा छळ केला जात होता असा आरोप केला जात आहे. मात्र तो आरोप खोटा असून क्रिशाच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती मिळून देखील तिला मुक्त स्वातंत्र्य दिले गेले नसते. क्रिशाच्या सासरी सर्वकाही व्यवस्थित आनंदी वातावरण होते. त्यामुळे क्रिशा नेहमीप्रमाणे गेल्या शुक्रवारी आपल्या मुलांना शाळेला सोडण्यात जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. त्यानंतर आपल्या अनैतिक संबंध उघड होणार या भीतीपोटी तिने आपल्या मुलांसह आत्महत्या केली आहे, असे दिनेश केशवानी याने स्पष्ट केले.
याप्रकरणी आम्ही सर्वजण पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत पोलिसांनी आमच्याकडील ऑडिओ क्लिपची शहानिशा करावी. घडला प्रकार इतका अनपेक्षित आहे की त्यामुळे मनीष आणि त्याचे कुटुंबीयही सध्या बेपत्ता आहेत. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. आमची फिर्याद नोंदवून घेतली जावी. तसेच एकंदर याप्रकरणी पारदर्शक चौकशी केली जावी आणि सर्वप्रथम क्रिशा आणि तिच्या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली जावी, अशी विनंतीही दिनेश केशवानी याने पत्रकार परिषदेत केली.